Posts

माणसातला माणूस

Image
documentry च्या निमित्ताने यावर्षी गावाकडचा पोळा बघायला भेटला . खूप मज्जा आली या दोनदिवसाच्या आभाळभर आठवणी घेऊन आमची झुग झुग गाडी औरंगाबादच्या दिशेनी निघाली . documentry  चा भाग म्हणून आम्ही येता येता गाडीमध्येही शूट करत होतो . हे सगळं चालू असताना दुरवरूनच आम्हला टाळ्यांचा आवाज आला . टाळ्यांचा आवज ऐकताच लोकांची तोंड वाकडी होउ लागली . तर काहीजण हसू लागली . आम्ही मात्र आमच्या कामात व्यस्थ होतो . तेवढ्यत ती आमच्या जवळ आली तिने माझ्या हातात कॅमेरा पहिला आणि म्हणाली माझा एक फोटो काढ ना  . मीही तिला हसत समोर बस म्हण्टलं फोटो काढण्यासाठी.... तिला आनंद झाला आणि ती समोर बसली . तिचा फोटो काढल्यानंतर तिने विचारलं तू कसा पाठवशील फोटो . मग आम्ही तिला व्हाट्सअप नंबर मागितला . तिने तिच्या मित्राचा नंबर आम्हला दिला . तेवढ्यात पलीकडून किशोर आला आणि त्याने तिचे अभिनंदन केले . तिला कळलेच नाही कि हा कश्याबद्दल अभिनंदन करतोय तर ,  मग आम्ही तिला थोडक्यात तिला कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं . तिला माहीतच नव्हतं कि ती आता मुक्त झालीये ते .  आम्ही तिच्याशी मनसोक्तपणे ...

शंभराची नोट

 युट्युब वर व्हिडीओ टाकण्यासाठी एवढा व्यस्थ झालोय कि काही लिहिण्यासाठी वेळच भेटत नाहीये . पण आज एक मजेशीर गोष्ट घडली म्हणून कदाचित माझ्या बोट आपोआप लिखाणाकडे  वळली . सकाळ पासून अमि ब्रोs  च्या पहिल्या भागाचे एडिटिंग करत बसलो होतो . संध्याकाळचे पाच वाजले होते माझी एडिटिंग चालूच होती . मधेच फोन बोंबला अनोन नंबर वरून कॉल होता . मी पुटपुटलो , समोरचा व्यक्ती ओळखलं का म्हणाला ? सुरवातीला लक्षात नाही आलं पण नंतर आवाज ओळखीचा वाटला . माझा पॉलीटेकनिक मधला मित्र सोमनाथ चा तो आवाज होता . माझं घर माहिती नसल्यामुळे  जवळच्या गार्डन मध्ये तो आला होता .        दिवसभर लॅपटॉप समोर बसून मीही जरा सुस्तावलो होतो . म्हणून कसलाही विचार न करता सुरज ला घेऊन गार्डन कडे निघालो .  शिवाय सोमनाथ ला बऱ्याच दिवसानंतर भेटणार होतो म्हणून एक उत्सुकताहि होती . गार्डन जवळ गेल्यावर बाहेरूनच मी त्याला पाहिले . त्यानेही मला लगेच ओळखले आणि आम्ही लांबूनच एकमेकांना हाथ दाखवला . त्याच्या सोबत त्याचे दोन मित्र पण होते . जवळ गेल्यानंतर मी त्याला हातात हात देण्यासाठी ...

समजूत

Image
  मला चांगलं आठवतंय माझ्या लहानपणी मी तिसरी - चौथीला असतानाची गोष्ट आहे . शिक्षणाच्या बाजारामध्ये नवीन - नवीन गोष्टींचं आगमन झालं होत . त्यामध्ये सेमी इंग्लिश , इंग्लिश माध्यम , सी.बी.एस.ई  पॅटर्न  , आमुक तमुक  पॅटर्न ई. गोष्टींचा समावेश होता . कदाचित लोकांनाही  त्या गोष्टींचं झालेलं आगमन आवडलं असावं . त्यामुळे जे आपल्याला भेटलं नाही ते आपल्या पोरांना भेटावं त्या अपेक्षेने लोक आपल्या लाडक्या मुलांना या नवीन शिक्षणाची चव चाखवत होते . आमच्या नातेवाईकांमध्येही काहीजणांनी त्यांच्या मुलांना  सी.बी.एस.ई  पॅटर्न ला टाकले होते . म्हणून मलाही माझ्या वडिलांनी  सी.बी.एस.ई  पॅटर्न  मध्ये टाकावं असं मला सारखं वाटत होत . सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत असणारी त्यांची शाळा , त्यांचे वेगवेगळे असलेले युनिफॉर्म , त्याच्या शाळेत राबणारे नवीन - नवीन कार्यक्रम हे सगळं मला तेव्हा मोहात पडणार होत . म्हणून मी माझ्या वडिलांकडे सारखा हट्ट करायचो . महाली त्याचा शाळेत जायचं नाहीतर मी तुम्हाला बोलणारच नाही अश्या धमक्या देयचो  .    मा...