शंभराची नोट




 युट्युब वर व्हिडीओ टाकण्यासाठी एवढा व्यस्थ झालोय कि काही लिहिण्यासाठी वेळच भेटत नाहीये . पण आज एक मजेशीर गोष्ट घडली म्हणून कदाचित माझ्या बोट आपोआप लिखाणाकडे  वळली . सकाळ पासून अमि ब्रोs  च्या पहिल्या भागाचे एडिटिंग करत बसलो होतो . संध्याकाळचे पाच वाजले होते माझी एडिटिंग चालूच होती . मधेच फोन बोंबला अनोन नंबर वरून कॉल होता . मी पुटपुटलो , समोरचा व्यक्ती ओळखलं का म्हणाला ? सुरवातीला लक्षात नाही आलं पण नंतर आवाज ओळखीचा वाटला . माझा पॉलीटेकनिक मधला मित्र सोमनाथ चा तो आवाज होता . माझं घर माहिती नसल्यामुळे  जवळच्या गार्डन मध्ये तो आला होता . 

      दिवसभर लॅपटॉप समोर बसून मीही जरा सुस्तावलो होतो . म्हणून कसलाही विचार न करता सुरज ला घेऊन गार्डन कडे निघालो .  शिवाय सोमनाथ ला बऱ्याच दिवसानंतर भेटणार होतो म्हणून एक उत्सुकताहि होती . गार्डन जवळ गेल्यावर बाहेरूनच मी त्याला पाहिले . त्यानेही मला लगेच ओळखले आणि आम्ही लांबूनच एकमेकांना हाथ दाखवला . त्याच्या सोबत त्याचे दोन मित्र पण होते . जवळ गेल्यानंतर मी त्याला हातात हात देण्यासाठी हात पुढे केला . तसेच त्यानेही त्याचा हाथ पुढे केला पण तो हातात हाथ देण्यासाठी नाही तर मला १०० रु  ची नोट देण्यासाठी ....... तो मला हि नोट  का देतोय हे मला काळातच नव्हतं . मग मीही त्याला विचारलं मला कशाला देतोय हे पैशे कशाचे आहे . मला काही कळतच नव्हतं . तो म्हणाला तू आधी हातात तर घे मग सांगतो . पैसे हातात घेतल्याशिवाय तो काही बोलणारच नव्हता हे मला जाणवले . म्हणुन मीही ती शंभरची नोट हातात घेतली . नोट  हातात घेतल्यानंतर त्याने मला सगळी गोष्ट सांगितली . आणि मग मलाही  सगळं आठवलं . 


     दोन वर्षांपूर्वी तो माझ्याकडे आला होता तेव्हा त्याच्या मित्राला  अर्जंट शंभर रु पाहिजे होते . त्याच्याकडे नसल्यामुळे तो त्याच्या मित्राला घेऊन माझ्याकडे आला होता . मी तेव्हाही काही पैसे कमवत नव्हतो आणि आजही काही कमवत नाही . पण त्याची अडचण लक्षात घेऊन मी माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन त्याला दिले . आणि त्यानंतर आमची काही भेट झालीच नाही . मीही पॉलीटेकनिक सोडून माझ्या दुसऱ्या मार्गाला लागलो . आणि त्यानेही दुसऱ्या कॉलेज ला ऍडमिशन घेतले होते . त्यांनतर आम्ही आज चक्क दोन वर्षांनी भेटलो . सोशल मीडिया च्या माध्यमातून आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो . पण तिथेही कधी आसा पैशाचा विषय निघाला नाही . आणि मी तरं कधी विसरून गेलो हे मलाही आठवत नाहीये . त्याच्या त्या दोन मित्रांपैकी एक मित्र तोच होता ज्याने पैसे घेतले होते . पण शिक्षणामुळे बाहेर असल्या कारणाने त्याला इकडे येईल जमले नाही . 

         हे सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त पैकी गप्पा मारल्या . सोमनाथलाही युट्युब वर विडिओ टाकायला आवडत . त्यामुळे तो मला नेहमी काही ना काही विचारत असतो . म्हणून मीही आनंदाने त्याला पाहिजे ते सांगत असतो . नंतर त्याच्या दुसऱ्या मित्राला बाहेर जायचे असल्यामुळे ते जास्त वेळ थांबले नाही . पुन्हा आल्यावर नक्की भेट आस  म्हणून मी आणि सुरज घराकडे निघालो . शेवट पर्यंत ती शंभरची नोट माझ्या हातातच होती . नंत्तर त्या नोटकडे पाहून माझ्या चेर्याव्र एक स्मित हास्य आलं आणि अलगद ती नोट  मी माझ्या प्यांटच्या खिशात टाकली . 

            आपण केलेल्या एखाद्या चांगल्या कामामुळे आपण नेहमी लोकांच्या लक्षात राहतो याच एक चांगलं उदहारण मला आज अनुभवायला मिळालं . पण काही काही लोक अपवाद असतात त्याला ...... त्यांना कशाचीच जाणीव नसते ...... असो आपण आपलं माणूस म्हणून जगत  राहुयात ....... एडिटिंग अजून बाकीचं आहे ....आता तिकडे वळतो ......... आज इथेच थांबतो ....... 


                                                                                                                          - अमि 

Comments

Post a Comment