समजूत
मला चांगलं आठवतंय माझ्या लहानपणी मी तिसरी - चौथीला असतानाची गोष्ट आहे . शिक्षणाच्या बाजारामध्ये नवीन - नवीन गोष्टींचं आगमन झालं होत . त्यामध्ये सेमी इंग्लिश , इंग्लिश माध्यम , सी.बी.एस.ई पॅटर्न , आमुक तमुक पॅटर्न ई. गोष्टींचा समावेश होता . कदाचित लोकांनाही त्या गोष्टींचं झालेलं आगमन आवडलं असावं . त्यामुळे जे आपल्याला भेटलं नाही ते आपल्या पोरांना भेटावं त्या अपेक्षेने लोक आपल्या लाडक्या मुलांना या नवीन शिक्षणाची चव चाखवत होते . आमच्या नातेवाईकांमध्येही काहीजणांनी त्यांच्या मुलांना सी.बी.एस.ई पॅटर्न ला टाकले होते . म्हणून मलाही माझ्या वडिलांनी सी.बी.एस.ई पॅटर्न मध्ये टाकावं असं मला सारखं वाटत होत . सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत असणारी त्यांची शाळा , त्यांचे वेगवेगळे असलेले युनिफॉर्म , त्याच्या शाळेत राबणारे नवीन - नवीन कार्यक्रम हे सगळं मला तेव्हा मोहात पडणार होत . म्हणून मी माझ्या वडिलांकडे सारखा हट्ट करायचो . महाली त्याचा शाळेत जायचं नाहीतर मी तुम्हाला बोलणारच नाही अश्या धमक्या देयचो .
माझं हे सगळं काही चालत असताना वडील मात्र शांत असायचे . आणि माझ्या जवळ येऊन माझी समजूत काढायचा ते प्रयत्न करायचे . ते म्हणायचे कि मी पहिली ते दहावी एकाच शाळेत शिक्षण घेतलं कधीच शाळा बदली नाही . आणि मी माझा एक नवीन रेकॉर्ड बनवला . त्यामुळे मला माझा नेहमी अभिमान वाटतो . तुला जर आपण दुसऱ्या शाळेत टाकले तर मग तू तुझा रेकॉर्ड नाही बानू शकणार . त्यामुळे आता तूच ठरव तुला दुसऱ्या शाळेत टाकायचे का तुला पण माझ्या सारखा तुझा रेकॉर्ड बनवायचा आहे . वडिलांचं बोलणं माझ्या मनाला इतकं पटलं कि , मी दुसऱ्या शाळेत जायचा माझा विचार लगेच विसरून गेलो . मग मी आनंदाने आणि गर्वाने सगळ्यांना सांगू लागलो कि , मी नाही आता दुसऱ्या शाळेत जाणार याच शाळेत राहून मी माझा रेकॉर्ड बनवणार आहे . वडिलांनी काढलेली ती माझी समजूत शाळा संपेपर्यंत माझ्या मनात राहिली आणि अजूनही आहे .
सी.बी.एस.ई पॅटर्न चा येणार खर्च माझ्या वडिलांच्या खिशाला परवडणारा नव्हता . पण कसलीही समज नसलेल्या आपल्या लहान मुलाला हे कस पटवून देणार . म्हणून कदाचित त्यांनी हे सगळं सांगत न बसता आपल्याकडे असलेली गोष्ट काही कमी नाही हे मला तेव्हा माझ्या भाषेत पटवून दिल . आज कदाचित हे सगळं चित्र बद्दल आहे . वडिलांना पन्नास रुपये मागतानाही मी पन्नास वेळा विचार करायला लागलोय . माझ्या आंथरुणाची लांबी मला आता कळायला लागली आहे . हे सगळं वडिलांनी काढलेल्या समजुतीमुळेच असावं . त्यामळे तेव्हा वडिलांनी माझी समजूत काढली नसती तर मी आज तेवढाच हट्टी राहिलो असतो . मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली नसती . म्हणून एखाद्याची समजूत काढणे हे तेवढेच म्हत्वाचे आहे . असे म्हणायला आपल्याला काही हरकत नाही .
- अमि

मस्त अमि
ReplyDeletethnx sir ji
DeleteVery true 😃
ReplyDeletethanx
Deleteखूपच छान लिहितोयस.👌
ReplyDeleteपुस्तके वाचण्याची सवय
ठेव , तुझा शब्दसाठा वाढेल😃
thank bro
DeleteWaa amiiii nice write-up... Keep it up 🌻
ReplyDeletethanx chhoti
Delete