माणसातला माणूस



documentry च्या निमित्ताने यावर्षी गावाकडचा पोळा बघायला भेटला . खूप मज्जा आली या दोनदिवसाच्या आभाळभर आठवणी घेऊन आमची झुग झुग गाडी औरंगाबादच्या दिशेनी निघाली . documentry  चा भाग म्हणून आम्ही येता येता गाडीमध्येही शूट करत होतो . हे सगळं चालू असताना दुरवरूनच आम्हला टाळ्यांचा आवाज आला . टाळ्यांचा आवज ऐकताच लोकांची तोंड वाकडी होउ लागली . तर काहीजण हसू लागली . आम्ही मात्र आमच्या कामात व्यस्थ होतो . तेवढ्यत ती आमच्या जवळ आली तिने माझ्या हातात कॅमेरा पहिला आणि म्हणाली माझा एक फोटो काढ ना  . मीही तिला हसत समोर बस म्हण्टलं फोटो काढण्यासाठी.... तिला आनंद झाला आणि ती समोर बसली . तिचा फोटो काढल्यानंतर तिने विचारलं तू कसा पाठवशील फोटो . मग आम्ही तिला व्हाट्सअप नंबर मागितला . तिने तिच्या मित्राचा नंबर आम्हला दिला . तेवढ्यात पलीकडून किशोर आला आणि त्याने तिचे अभिनंदन केले . तिला कळलेच नाही कि हा कश्याबद्दल अभिनंदन करतोय तर ,  मग आम्ही तिला थोडक्यात तिला कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं . तिला माहीतच नव्हतं कि ती आता मुक्त झालीये ते .  आम्ही तिच्याशी मनसोक्तपणे गप्पा मारतोय या गोष्टीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता . नंतर आम्ही तिची एक छोटीशी मुलाखत पण घेतली . तिच्या दिनचर्या बद्दल तिला विचारलं . ती सगळं काही आनंदाने सांगत होती . ती रोज सकाळी लवकर उठते , झाडून काढते , गाईला - शेळीला चारा देते , भांडी घासते आणि नंतर तिच्या गुरूंना उठवते त्यांना चहा देते . तिचे गुरु तिला खूप जीव लावतात हेही ती आनंदाने सांगत होती . अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे तीला आमच्या सोबत गप्पा मारताना एवढा आनंद झाला कि , ती पैसे मागायचे सोडून आमच्या सोबत गप्पा मारत बसली . एक आठवण म्हणून तिच्यासोबत फोटो काढला .  पुढच्या स्टेशन ला तिने  तिच्या गुरूंसोबत आमची ओळखही  करून दिली . आम्ही त्यांचा नंबर घेतला . लवकरच आम्ही तुमच्या घरी येऊन तुमची मुलाखत घेऊ असाही आम्ही त्यांना सांगितलं . नंतर एका स्टेशनला ती खाली उतरली आणि आमची  झुग झुग गाडी पुढे निघाली . गाडी निघाल्यावर तिने आम्हाला बाय केलं ..... आणि फोटो नक्की पाठव रे आस म्हणली . तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आताही माझ्या डोळ्यासमोर येतोय .... तेव्हा सुरज ने म्हण्टलेली  एक ओळ आठवतेय मला ती अशी ...... " यह नजरीया बदलना होगा इन्सान को इन्सान दिखाना होगा " ....... खरचं खूप छान वाक्य आहे सुरज . आपण नक्कीच माणसातला माणूस शोधण्यात यशस्वी झालो आहेत . आणि पुढे असे प्रयत्न करतच राहू .  तिला फोटो पाठवल्यानंतर हि पोस्ट शेअर करतोय..... एवढं सगळं लिहल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला असेल .... कि तीच नाव काय होत ..... तीच नाव खूप गोड आहे ...म्हणून शेवटी सांगत आहे ...... जेणेकरून पोस्ट चा शेवट हि गोड होईल ........स्वाती 



                                                                                                                    - अमि 

Comments