शंभराची नोट
युट्युब वर व्हिडीओ टाकण्यासाठी एवढा व्यस्थ झालोय कि काही लिहिण्यासाठी वेळच भेटत नाहीये . पण आज एक मजेशीर गोष्ट घडली म्हणून कदाचित माझ्या बोट आपोआप लिखाणाकडे वळली . सकाळ पासून अमि ब्रोs च्या पहिल्या भागाचे एडिटिंग करत बसलो होतो . संध्याकाळचे पाच वाजले होते माझी एडिटिंग चालूच होती . मधेच फोन बोंबला अनोन नंबर वरून कॉल होता . मी पुटपुटलो , समोरचा व्यक्ती ओळखलं का म्हणाला ? सुरवातीला लक्षात नाही आलं पण नंतर आवाज ओळखीचा वाटला . माझा पॉलीटेकनिक मधला मित्र सोमनाथ चा तो आवाज होता . माझं घर माहिती नसल्यामुळे जवळच्या गार्डन मध्ये तो आला होता . दिवसभर लॅपटॉप समोर बसून मीही जरा सुस्तावलो होतो . म्हणून कसलाही विचार न करता सुरज ला घेऊन गार्डन कडे निघालो . शिवाय सोमनाथ ला बऱ्याच दिवसानंतर भेटणार होतो म्हणून एक उत्सुकताहि होती . गार्डन जवळ गेल्यावर बाहेरूनच मी त्याला पाहिले . त्यानेही मला लगेच ओळखले आणि आम्ही लांबूनच एकमेकांना हाथ दाखवला . त्याच्या सोबत त्याचे दोन मित्र पण होते . जवळ गेल्यानंतर मी त्याला हातात हात देण्यासाठी ...